रेमो डिसुझाचं अनोखं स्वप्न 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

बॉलीवूडमध्ये स्टायलीश नृत्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा सध्याचा स्टार डान्सर अन्‌ कोरिओग्राफर रेमो डिसुझा एक नवीन शो "डान्स प्लस 3' घेऊन आलाय.

बॉलीवूडमध्ये स्टायलीश नृत्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा सध्याचा स्टार डान्सर अन्‌ कोरिओग्राफर रेमो डिसुझा एक नवीन शो "डान्स प्लस 3' घेऊन आलाय.

त्या शोची टॅगलाईनच "वन लेव्हल अप' अशी आहे. रेमोने भारतीय डान्सचा चेहरामोहरा बदलला. तो जबरदस्त कोरिओग्राफरच नाही, तर उत्तम फिल्ममेकरही आहे. "वन लेव्हल अप' संकल्पनेबद्दल तो भरभरून बोलतो. तो म्हणतो, "वन लेव्हल अप' म्हणजे तुमच्यातील कलागुणांना चॅलेंज करणं. प्रत्येकाच्या स्वतःच्या मर्यादा असतात. त्या पार करून स्वतःतले नवीन गुण शोधणं म्हणजेच माझ्यासाठी "वन लेव्हल अप' संकल्पना आहे. आपल्या आयुष्यातील "वन लेव्हल अप'बाबत सांगताना तो म्हणतो, की मला फिरायला खूप आवडते. दिल्ली ते लडाख बाईक प्रवासाचं माझं स्वप्न आहे. लडाख सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. मला बाईकवरून दिल्ली ते लडाख प्रवास करायचाच आहे. बघूया कधी जमतेय ते!