लैंगिक अत्याचाराविरोधात फरहानचे नवे पाऊल

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई : स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी अभिनेता फरहान अख्तर एक नवी योजना घेऊन आला आहे. पाॅप्युलेशन फौंडेशन आॅफ इंडिया आणि मर्द यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्म मेकिंगच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इनफ इज इनफ म्हणजेच अब बस बहुत हो गया असा या स्पर्धेचा विषय अाहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख असे इनाम देण्यात येणार आहे. याची माहीती देताना, फरहान म्हणाला, महिलांवरील सतत होणारे अत्याचार हे थांबायला हवेत. या समस्येबद्दल आजच्या तरुणाईला नेमके काय वा़टते, ते मला पाहायचे आहे. मला वाटते, या त्यांच्या फिल्ममधून हा नवा दृष्टीकोन समजून घ्यायला मदत होईल. 

भारतातील सर्व काॅलेजच्या म़ुलांना यात भाग घेता येईल. आपली फिल्म सबमिट करण्याची अंतिम तारीख 15 आॅगस्ट असेल. तर 2 आॅक्टोवरला याचे पारितोषिक वितरण होईल. ख्यातनाम दिग्दर्शक फिरोज अब्बास खान हेही मर्दच्या या उपक्रमात सहभागी असतील.