फरहानने पाहिले 20 भोजपुरी चित्रपट 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

फरहान अख्तरचा "लखनौ सेंट्रल' हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात फरहान महत्त्वाकांक्षी भोजपुरी गायकाची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी फरहान जोरदार तयारी करत आहे. तसा तो आपल्या प्रत्येक भूमिकेबाबत तयारी करतोच; पण ही भूमिका त्याने आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. फरहानने भूमिकेला न्याय देण्यासाठी सुपरस्टार रवी किशन व मनोज तिवारी यांचे तब्बल 20 भोजपुरी चित्रपट पाहिले. त्यात "बांके बिहारी विधायक', "धमल कायला राजा', "हमर देवदास', "ससुरा बाडा पैसावाला' असे चित्रपट होते. फरहानने चित्रीकरणाआधीच हे चित्रपट पाहिले.

फरहान अख्तरचा "लखनौ सेंट्रल' हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात फरहान महत्त्वाकांक्षी भोजपुरी गायकाची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी फरहान जोरदार तयारी करत आहे. तसा तो आपल्या प्रत्येक भूमिकेबाबत तयारी करतोच; पण ही भूमिका त्याने आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. फरहानने भूमिकेला न्याय देण्यासाठी सुपरस्टार रवी किशन व मनोज तिवारी यांचे तब्बल 20 भोजपुरी चित्रपट पाहिले. त्यात "बांके बिहारी विधायक', "धमल कायला राजा', "हमर देवदास', "ससुरा बाडा पैसावाला' असे चित्रपट होते. फरहानने चित्रीकरणाआधीच हे चित्रपट पाहिले. त्यामुळे "लखनौ सेंट्रल'मध्ये चांगला अभिनय करण्यासाठी मदत होईल, असा विश्‍वास त्याला आहे.