प्रियांकानंतर ट्रोलिंगसाठी नंबर 'दंगल' फेम फातिमा साना शेखचा

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

इंटरनेटचे अस्त्र हाती आल्यानंतर त्याचा फायदा तर झालाच. पण काही तोटेही लोकांना सहन करावे लागत आहेत. यात सगळ्यात साॅफ्ट टारगेट बनले आहे बाॅलिवूड. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भेटलेल्या प्रियांकाच्या पेहेरावावरून नेटकर्यानी तिच्यावर टिकेची झोड उठवली होती. आता अशा लोकांचे लक्ष दंगल गर्ल फातिमा साना शेखवर गेले आहे. 

मुंबई : इंटरनेटचे अस्त्र हाती आल्यानंतर त्याचा फायदा तर झालाच. पण काही तोटेही लोकांना सहन करावे लागत आहेत. यात सगळ्यात साॅफ्ट टारगेट बनले आहे बाॅलिवूड. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भेटलेल्या प्रियांकाच्या पेहेरावावरून नेटकर्यानी तिच्यावर टिकेची झोड उठवली होती. आता अशा लोकांचे लक्ष दंगल गर्ल फातिमा साना शेखवर गेले आहे. 

फातिमा सध्या परदेशात असून तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. यात ती समुद्रकिनारी स्वीमसूटसारखा दिसणारा ड्रेस घालून बसली आहे. हा फोटो तिने अपलोड केल्यानंतर काही वेळातच तिच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. या कमेंट्स विशिष्ट समाजातील लोकांच्या असून सध्या सुरू असलेल्या रमझानचा संदर्भ येथे देण्यात आला आहे. यावर फातिमा फार काही रिअॅक्ट झालेली नाही. पण हा सगळा ताप विनाकारण असल्याचेही काहींनी या कमेंट्सवर सांगितले आहे. फातिमाने घातलेल्या ड्रेसमध्ये काहीही आक्षेपार्ह नसून ती व्यक्तिगत ट्रीपवर असून काय घालावे वा नाही हा तिचा प्रश्न असल्याचे मतही अनेकांनी नोंदवले आहे.