सेन्सॉरच्या अध्यक्षांमुळेच चित्रपट उद्योग धोक्‍यात: पंडित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : प्रकाश झा निर्मित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाने (सेन्सॉर) परवानगी नाकारल्याने मंडळाचे सदस्य अशोक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंडळाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

निर्माते प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्‍लिल संवाद आणि दृश्‍ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. दिग्दर्शिका श्रीवास्तव यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा महिलांच्या अधिकारांवर हल्ला असल्याची टीका केली आहे.

या प्रकारावर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "बोर्डाच्या निर्णयाचा मी निषेध करतो. यामुळे चित्रपट निर्मात्यांचा आत्मविश्‍वास कमी होतो. पंकज निहलानी यांच्या अशा दृष्टिकोनामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आला आहे.'