फॉर्च्युन 500 मध्ये यंदा सात भारतीय कंपन्या

गुरुवार, 21 जुलै 2016

नवी दिल्ली: फॉर्च्युन मासिकाच्या जगभरातील आघाडीच्या 500 कंपन्यांच्या यादीत यंदा सात भारतीय कंपन्यांना स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये इंडियन ऑईल, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या चार सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स व राजेश एक्सपोर्ट्सदेखील यादीमध्ये सामील आहेत. उत्पन्नाच्या आधारावर कंपन्यांची क्रमवारी निश्चित केली जाते. 

रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट तब्बल 482,130 दशलक्ष डॉलर उत्पन्नासह जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने 54.7 अब्ज डॉलर उत्पन्नासह 161 वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे. यादीत पहिल्यांदाच स्थान प्राप्त झालेल्या राजेश एक्सपोर्ट्सचा क्रमांक 423वा आहे. याअगोदरच्या वर्षातील यादीत राजेश एक्सपोर्ट्सऐवजी सरकारी तेल उत्पादक कंपनी ओएनजीसीचा समावेश होता. 

मनोरंजन

लंडन: मी निस्सीम भारतीय आहे. भारताबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे भारतात मला परतायचे आहे. पण आदराने मला बोलावले तरच मी...

06.09 PM

मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या...

02.30 PM

मुंबई : सासू-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधी ठरली ती 'स्टार प्रवाह'ची 'पुढचं पाऊल'...

02.27 PM