भारतात शाहरूखचे मानधन सर्वाधिक; 12 महिन्यांतील कमाई 243 कोटी

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

फोर्व्जने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या 12 महिन्यांत  भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून शाहरूख खानने बाजी मारली आहे. त्याच्या उत्पन्नानुसार त्याने 243.7 कोटी रूपये कमावले आहेत. त्यानंतर सलमान आणि अक्षयकुमारचा नंबर लागतो. 

मुंबई : फोर्व्जने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या 12 महिन्यांत  भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून शाहरूख खानने बाजी मारली आहे. त्याच्या उत्पन्नानुसार त्याने 243.7 कोटी रूपये कमावले आहेत. त्यानंतर सलमान आणि अक्षयकुमारचा नंबर लागतो. 

नुकतीच फोर्व्जने ही यादी जाहीर केली आहे. जगभरातील कलाकारांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे तो अमेरिकन अभिनेता मार्क वाहबर्गने. त्याची ही मिळकत 68 मिलियन डाॅलर आहे. जगातल्या यादीत शाहरूख हा आठव्या स्थानावर आहे. तर सलमान खान आणि अक्षयकुमार अनुक्रमे 9 व्या व 10 व्या स्थानावर आहेत. शाहरूखची मिळकत गेल्या 12 महिन्यांत डाॅलर्समध्ये 38 मिलियन्स इतकी होते. 

हाॅलिवूडमध्ये पहिला क्रमांक मार्कने मिळवला आहेच. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर डिव्हाईन जाॅन्सन (65 मिलियन) आणि विन डिझेल (54 मिलियन) यांना स्थान देण्यात आले आहे. विशेष बाब अशी की पहिल्या 10 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची एकूण मिळकत 488.5 मिलियन होते. तर पहिल्या 10 महिला कलाकारांचे मानधन मिळून 172.5 मिलियन होते.