'पद्मावती' ते 'दशक्रिया' व्हाया 'न्यूड': भयग्रस्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य??

Movies_Collage
Movies_Collage

राजस्थानमधली कर्णी सेना उठते आणि 'पद्मावती' सिनेमाचे सेट जाळत सुटते. 'सेने'च्या दहशतीनं सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकायची विनंती राजस्थान सरकार केंद्र सरकारला करते. 

'न्यूड' सिनेमाच्या नावात नग्नता दिसते. 'सेक्सी दुर्गा' सिनेमाचं नाव सेन्सॉर बोर्डाला पटत नाही, म्हणून 'एस दुर्गा' केलं जातं; दोन्ही सिनेमे चित्रपट महोत्सवातून वगळले जातात. 

'दशक्रिया' कादंबरी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची. कादंबरीवर सिनेमा निघतो. राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आणि सिनेमाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ विरोध करतो. 

भारतीय राज्यघटनेतील कलम 19 नुसार नागरिकांना जी सहा स्वातंत्र्यं प्राप्त झालेली आहेत, त्यामध्ये सर्वात पहिले आहे ते अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. भाषण आणि व्यक्त होण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे. सिनेमा हे अभिव्यक्तीचे सर्वात प्रबळ माध्यम.

या माध्यमावर 'अंकुश' ठेवणं म्हणजे भारतीय नागरिकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित करणं आहे का?

की, सध्याच्या परिस्थितीत 'नियंत्रित' अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नागरीकांना बहाल केलं जावं?

संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबाबदारीनं वापर करण्याएवढी भारतीय लोकशाही खरंच मॅच्युअर झालेली आहे की नाही?

आपल्याला काय वाटतं???

प्रतिक्रियांमध्ये अवश्य नोंदवा आपलं मत...

काय आहेत या सिनेमांचे विषय?

पद्मावती

राणी पद्मिनी हीचा उल्लेख अवधी भाषेतील सुफी कवी मलिक मोहम्मद जयासी याच्या 1540 मधल्या 'पद्मावत' काव्यात आढळतो. चित्रपट या काव्यातील कथानकावर आधारित आहे. रतन सिंह किंवा रावळ रतन सिंह या मेवाड प्रांताच्या राजाची पद्मिनी ही राणी. तिच्या सौंदर्याची ख्याती एेकून दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी चित्तौडवर स्वारी करतो आणि राणी पद्मिनी 'जौहार' करते. 

न्यूड

चित्रकारांसाठी नग्न मॉडेल्स म्हणून काम करणाऱया स्त्रीची ही कथा. पोटासाठी पत्करलेला 'न्यूड' मॉडेलचा मार्ग पोटच्या मुलापासून लपवण्यासाठी आईची होणारी तडफड चित्रपटातून मांडली आहे. 

एस दुर्गा

एका व्हॅनमधून एका हायवेवरून एक जोडपं एका रात्री चेन्नईला पळून जातंय, हा चित्रपटाचा सारांश. या विलक्षण रात्री मानवी स्वभावाचे वेगेवेगळे कंगोरे चित्रपटातून उलगडले आहेत. 

दशक्रिया

हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि लेखक बाबा भांड यांच्या "दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com