फ्रेंड्‌स- द म्युझिकल पॅरडी 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

"स्मेली कॅट स्मेली कॅट व्हॉट आर दे फिडिंग यू....' हे फिबी बुफेच्या आवाजातलं गाणं आतापर्यंत अख्ख्या जगाचं फेव्हरेट गाणं बनलं असेल. अमेरिकन सिटकॉम्समधली "फ्रेंड्‌स' ही मालिका संपल्यानंतरही जवळजवळ 17 वर्षं जगाला वेड लावत होती आणि आजही ती तरुणाईला साद घालते आहे. फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगाला या मालिकेने वेड लावले होते.

आजही बहुतेक तरुणांच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये "फ्रेंड्‌स'चे दहाही सीजन अगदी सेव्ह करून ठेवलेले तुम्हाला दिसतील. अनेक तरुणांना विचारलं तर "फ्रेंडस्‌' त्यांच्यासाठी कधीही कोणताही एपिसोड बघितला तरी रिफ्रेश होण्याचं एक माध्यम असल्याचं ते सांगतात. आता हीच फ्रेंडस्‌ची जादू परत येतेय म्युझिकल पॅरडीच्या रूपात. मोनिका, चॅंडलर, रॉस, रेचल, जोई, फिबी या सहा फ्रेंडस्‌ची कहाणी न्यूयॉर्कमध्ये ऑफ ब्रॉडवेमध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे. तीसुद्धा म्युझिकल. या म्युझिकल पॅरडीमध्ये "45 ग्रुव स्ट्रीट- हाऊ कॅन वी ऍफोर्ड दिस प्लेस?', "वी वेअर ऑन अ ब्रेक' आणि या मालिकेचे थीम सॉंग "वी विल ऑलवेज बी देअर फॉर यू' तसेच फेमस फिबीचे गाणे स्मेली कॅट पण असणार आहे. सह लेखक टॉबली मॅकस्मिथ यांच्या म्हणण्यानुसार फ्रेंड्‌सच्या सगळ्या टीमला म्हणजेच अगदी मॉर्सेल या माकडापासून ते जेनिसपर्यंत सगळ्यांना स्टेजवर आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. ही म्युझिकल पॅरिडी कधी एकदा न्यूयॉर्कमध्ये येतेय हे पाहायला तमाम फ्रेंड्‌स फॅन उत्सुक आहेत...