कल्पनेतून वास्तवाकडे 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

"चंद्रकांता' ही जुनी काल्पनिक मालिका एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर आली. त्यात गौरव खन्ना आणि कृतिका कामरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. आजवर "कुमकुम भाग्य', "ये प्यार ना होगा कम' अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या गौरवला सध्या वेध लागलेत ते रिऍलिटी शोचे. तो म्हणतो की, "मी या क्षेत्रात येण्याचं कधीही ठरवलं नव्हतं. मी आधी मुंबईत एमबीए करण्यासाठी आलो. नंतर मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम केलं. त्यानंतर मॉडेलिंग, नंतर जाहिराती आणि मालिकांमधून काम केलं; पण आता एवढ्या जाहिराती आणि काल्पनिक मालिका केल्यानंतर मला रिऍलिटी शोमध्ये काम करायला आवडेल. मग तो कोणताही रिऍलिटी शो असो.

"चंद्रकांता' ही जुनी काल्पनिक मालिका एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर आली. त्यात गौरव खन्ना आणि कृतिका कामरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. आजवर "कुमकुम भाग्य', "ये प्यार ना होगा कम' अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या गौरवला सध्या वेध लागलेत ते रिऍलिटी शोचे. तो म्हणतो की, "मी या क्षेत्रात येण्याचं कधीही ठरवलं नव्हतं. मी आधी मुंबईत एमबीए करण्यासाठी आलो. नंतर मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम केलं. त्यानंतर मॉडेलिंग, नंतर जाहिराती आणि मालिकांमधून काम केलं; पण आता एवढ्या जाहिराती आणि काल्पनिक मालिका केल्यानंतर मला रिऍलिटी शोमध्ये काम करायला आवडेल. मग तो कोणताही रिऍलिटी शो असो. डान्स, कॉमेडी, ऍक्‍शन काहीही करायला मला आवडेल.'