'घाडगे & सून' मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताचं शुभमंगल सावधान

टीम ई सकाळ
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या घाडगे & सून मालिकेला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. मालिकेमधील सुकन्या कुलकर्णी मोने निभावत असलेली माईंची भूमिका, चिन्मय उदगीरकरची अक्षयची भूमिका लोकांना आपल्यातीलच एक वाटत आहे. मालिका सुरु झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार कि नाही याविषयी बरीच उत्सुकता होती. मनाविरुध्द होणार हे लग्न टाळण्यासाठी अक्षय आणि अमृताने अनेक प्रयत्न केले पण आता अखेर हे दोघं लग्न मंडपापर्यंत येऊन पोहचले आहेत.
 

मुंबई : कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या घाडगे & सून मालिकेला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. मालिकेमधील सुकन्या कुलकर्णी मोने निभावत असलेली माईंची भूमिका, चिन्मय उदगीरकरची अक्षयची भूमिका लोकांना आपल्यातीलच एक वाटत आहे. मालिका सुरु झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार कि नाही याविषयी बरीच उत्सुकता होती. मनाविरुध्द होणार हे लग्न टाळण्यासाठी अक्षय आणि अमृताने अनेक प्रयत्न केले पण आता अखेर हे दोघं लग्न मंडपापर्यंत येऊन पोहचले आहेत.

माईंच्या सांगण्यावरून अक्षय हे लग्न करण्यास तयार झाला आहे. पण या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नाही कारण दोघांचीही स्वप्न, ध्येय वेगळी आहेत. अक्षय – अमृताच्या मनाविरुध्द जुळलेलं हे नातं माईंच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल ? हे दोघेही संसाराचा भार पेलू शकतील ? या लग्नामध्ये आलेल्या असंख्य अडचणीवर मात करून माईनी अक्षयला लग्नासाठी तयार केले आहे पण,लग्नानंतर त्या कसं या दोघांना लग्न या पवित्र बंधनाचे महत्व पटवून देतील ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका अक्षय – अमृताचा लग्नसोहळा ६ सप्टेंबरला रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.  

घाडगे परिवारासाठी माईंना अशी सून हवी आहे जी घराला एकत्र बांधून ठेवेल, जी आपल्या जबाबदाऱ्या तसेच घरातल्या लोकांना समजून घेईल. या सगळ्या गोष्टी त्यांना कियारा मध्ये नाहीतर प्रभुणेंच्या अमृतामध्ये बघत्याक्षणीच दिसल्या आणि म्हणून त्यांनी परिवाराच्या सहमताने अमृताला अक्षयची बायको म्हणून घाडगे परिवारात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु, अमृताने करीअरला स्वत:च्या आयुष्यात अधिक महत्व दिल्यामुळे अक्षयशी लग्न करायला लागणार या कल्पनेने ती थोडीशी अस्वस्थ झाली, तर दुसरीकडे अक्षयचे कियारावर प्रेम आहे त्यामुळे तो देखील माईंच्या या निर्णयाने हादरला. अनेक अडचणी पार करत माईनी अक्षय आणि अमृताच्या लग्नाच्या हळद ते सप्तपदीपर्यंतच्या सगळ्या विधी पार पडल्या आणि अमृताचे लग्न अक्षयशी होऊन ती घाडगे परिवारमध्ये आली. पण, आता या नंतरचा प्रवास या दोघांसाठी कसा असेल ? अमृता या परिवारातल्या मंडळीशी कशी जुळवून घेईल ? कसे अक्षय आणि अमृता एकमेकांना स्वीकारतील ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.