#Review Live: कलाकार दिग्दर्शकाच्या उपस्थितीत 'घुमा'ने मिळवले 3 चीअर्स

गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे : डिजिटल माध्यमात कोणीही आपल मत मांडू शकतं. म्हणून ई सकाळने सर्वात आधी सुरू केली ती कलाकार दिग्दर्शकांच्या उपस्थितीत रिव्ह्यूची पद्धत. समीक्षकासोबत कलाकारांनाही त्यांचं म्हणणं मांडता यावं म्हणून सुरू झालेला हा प्रयोग खूप नावाजला गेला. या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या घुमा या चित्रपटाचा असा कलाकार दिग्दर्शकाच्या उपस्थितीत रिव्ह्यू करण्यात आला. महत्वाचा विषय, त्याची नेटकी मांडणी, योग्य पात्र निवड आणि पहिल्या प्रयत्नात सिनेमा या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी यामुळे ई सकाळने या चित्रपटाला दिले 3 चीअर्स.

#Review Live:  'घुमा

महेश काळे या दिग्दर्शकाने अत्यंत गांभीर्याने हा विषय मांडला आहे. ग्रामीण भागात होणारं इंग्रजीचं अतिक्रमण, त्या इंग्रजीकडे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन.. याभवती चित्रपट फिरतो. तात्याचा मोठा मुलगा फार शिकलेला नाही. पण ते उत्तम मेकॅनिक आहे. आपल्या मोठ्या मुलाने शिकायला हवं होतं असं आडाणी तात्याला मनोमन वाटायचं. पण ते स्वप्न घेऊन तो आपल्या धाकट्या मुलाकडे पाहातो. त्याने शिकावं तेही इंग्रजी शाळेत असा त्याचा आग्रह आहे. मुलालाही इंग्रजीत गती आहे. सध्या त्याचा धाकटा मुलगा गुणा पंचायतीच्या शाळेत जातो. 50 रूपये फि असलेल्या शाळेतून काढून 30 हजार रूपये वार्षिक फी भरायची तयारी तात्याने सुरु केली आहे. पण ही तयारी गुणाला शाळेत घालायला पुरे पडते की आणखी काही विघ्न आड येतात याचाा मिळून हा चित्रपट तयार झाला आहे. 

शरद जाधव, पूनम पाटील हे या चित्रपटाचे दोन महत्वाचे खांब आहेत. शिवाय गोष्टीरूपातून येणारे सरपंच, तात्याचा मोठा भाऊ, वकील आदी व्यक्तिरेखाही अचूक आहेत. या दिग्दर्शनावर नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे यांच्या स्कूलमधून काळे तयार झाले आहेत. इंग्रजी आणि मराठी शाळांमध्ये सूरू असलेलं द्वंद्व हे शहरापासून पार ग्रामीण स्तरापर्यंत पोचलं आहे. पाल्याला शाळेत घालण्याचं हे द्वंद्व प्रत्येक पालकाला भिडतं. ते एकदा पाहायला हरकत नाही.