गप्पा #Live चित्रपट घुमा : नागराजच्या कामाचा फायदा आम्हाला होतो

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अहमदनगरची टीम सिनेसृष्टीत येऊ लागली आहे. नागराज मंजुळेने सैराट, फॅंड्रीसारखे चित्रपट देऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत भाऊराव कऱ्हाडे हा दिग्दर्शक ख्वाडासारखा चित्रपट घेऊन आला आणि त्या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. आता भाऊरावचा सहाय्यक महेश काळे नवा चित्रपट घेऊन येतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे घुमा. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

घुमा या चित्रपटाने यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पसंतीचा मान मिळवला आहे. शिवाय राज्य सरकारतर्फे दिला जाणारा  उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार या दिग्दर्शकाला मिळाला आहे. या चित्रपटाची टीमने ई सकाळच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी घुमा या चित्रपटाबद्दल गप्पा झाल्याच शिवाय कलाकारांनी आपले अनुभवही शेअर केले. या गप्पांमध्ये दिग्दर्शक महेश काळे, पूनम पाटील, शरद जाधव, आदेश आवारे, प्रमोद कसबे यांनी भाग घेतला.

सिनेमाच्या विषयाशी गप्पा झाल्या. ग्रामीण भागात इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेची असलेली स्थिती आदी विषयावर गप्पा मारल्या. हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.