आमावस्येच्या रात्री 'गर्ल्स हाॅस्टेल'मध्ये उडणार हाहाकार!

टीम इ सकाळ
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

‘गर्ल्स हॉस्टेल’ मध्ये आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांनी मालिकेची उत्कंठा वाढवलेली आहे. या मालिकेत सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत होत्या. पहिल्याच भागात सर्वांच्या लाडक्या साराचा अनपेक्षितरित्या मृत्यू झाला आणि हॉस्टेलमध्ये अनेक भीतीदायक घटना घडू लागल्या.

मुंबई : जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. तसं पाहाल तर हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. झी युवावरील अत्यंत लोकप्रिय मालिका 'गर्ल्स हॉस्टेल' अश्याच प्रकारची भयाची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यास यशस्वी ठरली आहे. लहान मोठ्या शहरांतील आबाल वृद्धांमध्ये ही मालिका लोकप्रिय आहे. ह्या मालिकेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या ९ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच हादरून जाते. भयाची चाहूल सोबत घेऊन आलेली “गर्ल्स हॉस्टेल ...  कोणीतरी आहे तिथे” ही मालिका, सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा. झी युवावर पाहायला मिळते. 

‘गर्ल्स हॉस्टेल’ मध्ये आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांनी मालिकेची उत्कंठा वाढवलेली आहे. या मालिकेत सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत होत्या. पहिल्याच भागात सर्वांच्या लाडक्या साराचा अनपेक्षितरित्या मृत्यू झाला आणि हॉस्टेलमध्ये अनेक भीतीदायक घटना घडू लागल्या.

आतापर्यंत हॉस्टेलमधील मुलींसोबत घडणाऱ्या गूढ घटनांची तीव्रता आता अधिक गडद होत जाणार आहे, आणि अंगावर शहरे आणणाऱ्या , काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अकल्पित घटनाची शृंखला अनुभवायला मिळणार आहे. २० सप्टेंबरच्या सर्वपित्री आमावस्या निमित्त दाखवण्यात येणाऱ्या महा एपिसोड पासून मालिका वेगळेच वळण घेणार आहे. भास आभासाच्या पलीकडे असणारी  अकल्पित शक्ती जी आपलं अस्तिव ठळक  पणे  दाखवणार आहे.  यामुळे भयाची एक वेगळीच अनुभूती आता प्रेक्षकांना महाएपिसोड पासून बघायला मिळणार आहे. “गर्ल्स हॉस्टेल ...  कोणीतरी आहे तिथे" या मालिकेत नावा प्रमाणेच आता 'कोणीतरी आहे तिथे' या वाक्याला प्रमाण देणारी घटना घडून, सर्व पित्री अमावस्येच्या गूढ रात्री ...कोणीतरी 'दिसणार' आहे तिथे .... आणि हे पाहण्यासाठी आपल्याला गर्ल्स हॉस्टेल रात्री १० वाजता पाहावी लागणार आहे.