गो गो गोविंदा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

अभिनय व डान्समध्ये "हिरो नंबर वन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा त्याच्या चाहत्यांच्या व रसिकांच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो त्याच्या जुन्या अवतारात पाहायला मिळणार आहे. त्याचा आगामी चित्रपट "आ गया हिरो' मधील "लोहे दा लीवर...' हे गाणे नुकतेच लॉंच करण्यात आले. या गाण्यात सुरूवातीपासून गोविंदा पियानो वाजवत थिरकताना दिसतो आहे. या गाण्यातील त्याचा डान्स पाहून आधीचा गोविंदा डोळ्यासमोर येतो आहे. 

या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली असून हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आता पुन्हा एकदा गोविंदाचा जुना अंदाज पाहायला मिळणार म्हणून त्याचे चाहते खूप खूश आहेत. 

Web Title: Go go Govinda