अजय, आर्शद म्हणतोय हम नही सुधरेंगे..

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई : गोलमाल अगेन हा चित्रपट आता लवकर प्रदर्शित होतो आहे. यापूर्वीच्या सर्व गोलमाल चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर चांगलं यश मिळवल्याने रोहित शेट्टीच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दर गाण्यागणिक चित्रपटाची उत्सुकता वाढते आहे. यापूर्वी गोलमाल आणि नींद चुराई मेरी ही दोन गाणी आली आहेत. आता तिसरं गाणं आज या टीमने रीलीज केंल. या गाण्याचे बोल आहेत हम नही सुधरेंगे.

हम नही सुधरेंगे.. 

मॅड काॅमेडी म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. अजय देवगण, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि तुषार कपूर ही मंडळी या चित्रपटात आहेत. शिवाय यावेळी परिणिती चोप्रा आणि तबू या दोन नायिकाही या चित्रपटात दिसणार आहेत. या तिसऱ्या गाण्यात ही सगळी मंडळी दिसतात. हे गाणंही उडत्या चालीचं असून त्याला प्रेक्षक पसंती मिळते की नाही ते मात्र पाहायला थोडा वेळ लागेल. हा चित्रपट 20 आॅक्टोबरला रिलीज होतोय.