के. एल. सेहगल यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक गुगल डुडल

बुधवार, 11 एप्रिल 2018

सेहगल यांनी अनेक अजरामर, अविस्मरणीय गाणी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. इक बंगला बने न्यारा, जब दिल ही टूट गया, जल जाने दो इस दुनिया को, बाबुल मोरा, दिल से तेरी निगाह.. ही व अशी बरीच गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही आहेत.

नवी दिल्ली : गानसम्राट व अभिनयातही आपली छाप उमटवणारे कलाकार के. एल. सेहगल यांची आज 114 वी जयंती. त्यानिमित्त त्यांचे आकर्षक डुडल तयार करून गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच अशा महान व्यक्तींना डुडलद्वारे मानवंदना देते. आज त्यांनी सेहगल यांच्या गायकीचा मागोवा घेतला आहे. 

11 एप्रिल 1904 साली सेहगल यांचा जन्म जम्मूत झाला. त्यांची आईही उत्तम गायिका असल्याने बालपणपासूनच त्यांनी आईकडून गायनाचे धडे गिरवले. भजन-किर्तनासोबतच त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचे मन शाळेत व शिक्षणात फारसे रमले नाही. त्यांनी लहान वयातच नोकरी करायला सुरवात केली. काही दिवस मुरादाबादला तर, त्यानंतर काही दिवस कानपूरमध्ये चामड्याच्या व्यावसायिकाकडे काम करता करता त्यांनी संगीताचे पुढील शिक्षण घतले.  

k l saigal

सेहगल यांनी अनेक अजरामर, अविस्मरणीय गाणी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. इक बंगला बने न्यारा, जब दिल ही टूट गया, जल जाने दो इस दुनिया को, बाबुल मोरा, दिल से तेरी निगाह.. ही व अशी बरीच गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही आहेत.

सेहगल यांनी गायनासोबतच अभिनयातही ठसा उमटवला. 1931-32 साली त्यांनी चित्रपटसृष्टील पाऊल ठेवले व नंतर मागे वळून बघितलेच नाही. हिंदीबराबरच बंगाली, तमीळ अशा विविध भाषांमध्येही त्यांनी चित्रपट केले व ते गाजले. त्यांनी एकूण 36 सिनेमांमध्ये काम केले व अभिनयातही यशाचे शिखर गाठले. त्यांचे प्रेसिडेंट, माय सिस्टर, जिंदगी, चांदीदास, भक्त सूरदास आणि तानसेन आदी चित्रपट प्रचंड गाजले होते.

Web Title: google doodle on birth anniversary of singer k l saigal