ग्रेसी गोस्वामी साकारणार राजकुमारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अभिनेत्री ग्रेसी गोस्वामी ही राजा शिलादित्यची धाकटी मुलगी आणि मलिंग राज्याची राजकन्या गरिमाची भूमिका साकारत आहे.

'मायावी मलिंग' या मालिकेत तीन राजकन्या प्रणाली, ऐश्‍वर्या आणि गरिमा यांची रोचक कथा आहे. या तीनही राजकन्या आपले राज्य मलिंगला वाचवण्यासाठी शौर्य दाखवतात. यामध्ये अभिनेत्री ग्रेसी गोस्वामी ही राजा शिलादित्यची धाकटी मुलगी आणि मलिंग राज्याची राजकन्या गरिमाची भूमिका साकारत आहे. ती अतिशय खोडकर आहे. मात्र, तिचा आत्मविश्‍वास दांडगा आहे.

यातील संवादांमधील उच्चारांना योग्य बनवण्यासाठी तिने भाषेचे प्रशिक्षणही घेतले. हार्नेस आणि तलवार वापरायलाही ती शिकलो. सर्व हार्नेस शॉट्‌समध्ये स्वतःला लवचिक ठेवण्यासाठी ती मिक्‍स्ड मार्शल आर्टसचे प्रशिक्षणही घेत आहे. ही कथा मलिंगच्या जादुई विश्‍वावर आधारलेली असून, ती राजकुमाऱ्यांची प्रेरणादायी कथा असल्याचे ग्रेसीने सांगितले. दरम्यान, ग्रेसीने 'बालिका वधू' या मालिकेपासून अभिनयाच्या करिअरला सुरवात केली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Gracie Goswami to be Princess

टॅग्स