परेश रावल पुन्हा "अतिथी' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

अजय देवगण, कोंकणा सेन शर्मा आणि परेश रावल यांचा "अतिथी तुम कब जाओगे' चित्रपट आठवतो आहे ना? या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे नाव आहे "गेस्ट इन लंदन'.

या सिक्वेलमध्ये अजय देवगण व कोंकणा सेन नाहीत; पण परेश रावल पुन्हा अतिथीच्या अवतारात पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यासह कार्तिक आर्यन आणि कृती खरबंदा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा लंडनस्थित आर्यन व अनन्या यांच्याभोवती फिरते. या दोघांचे लग्न झाले आहे, अशी भूलथाप ते देत असतात.

आर्यन पासपोर्टसाठी व अनन्या पैशांसाठी एकमेकांसोबत राहत असतात. त्यांच्या घरी पाहुणे आल्यानंतर घडणाऱ्या गमतीजमती या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.