घाण करायची तर टॉयलेटमध्ये जा; हरिहरन यांचा अभिजीतला डोस

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई : परेश रावल यांनी अरुंधती रॉयबाबत केलेल्या वक्तव्याला काहींनी पाठिंबा दिला. तर काही लोकांनी त्याला विरोध केला. गायक अभिजीतने रावल यांना पाठिंबा देताना अरूंधती यांनाच जीपला बांधण्याचा सल्ला दिला होता. यावर ट्‌विटरने तीव्र आक्षेप घेत त्याचे अकाउंट बंद केले. आता पहिल्यांदाच ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी आपली भूमिका मांडली. 

हरिहरन गेली 40 वर्षे या इंडस्ट्रीत काम करतायत. अभिजीतचा समाचार घेताना ते म्हणाले, 'आपण आपल्या घरात जी भाषा वापरतो, ती बाहेर पब्लिक प्लेसमध्ये वापरली जात नाही. बाहेर आल्यानंतर आपण अत्यंत जबाबदारीने बोलतो. वागतो. तुला जर घाण करायची असेल तर घरातल्या टॉयलेटमध्ये कर.' 

हरिहरन सहसा कोणत्याही वादात पडत नाही. पण यावेळी मात्र त्यांनी आपली ठोस भूमिका मांडली.