हॅलो मुंबई... 

hellooooooo mumbai : vidya balan
hellooooooo mumbai : vidya balan

विद्या बालनची रेल्वे प्रवाशांना साद 

मुंबई :  पश्‍चिम रेल्वेच्या 35 लाखांहून अधिक प्रवाशांना अभिनेत्री विद्या बालनचा "मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील स्टाइलमध्ये "हॅलो मुंबई...' हा आवाज स्टेशन व लोकलमध्ये लवकरच ऐकायला येणार आहे. रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांच्या होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने "जिंदा रहे' हे विशेष अभियान सुरू केले आहे. अभिनेत्री विद्या बालन व इतर बॉलीवूड अभिनेते प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आवाहन करणार आहेत. 
चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेत रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे प्रतिदिन पाच ते सहा प्रवाशी जखमी किंवा मृत्यू होण्याची नोंद होत असते. उपनगरीय हद्दीतील सर्व रेल्वे फाटक बंद केले असून प्रवाशांना फूटओव्हर ब्रीजची सोय उपलब्ध करून दिली आहे. तरीही, इच्छित स्थळी लवकरात लवकर पोहचण्यासाठी प्रवाशी रेल्वे रूळ ओलांडतात. प्रवाशांची ही मानसिकता बदलण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने आयडिया हाइव मीडिया प्रा.लि. यांच्या मदतीने "जिंदा रहे' हे अभियान 16 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली. 
"रेल्वे रूळ प्रवाशी का ओलांडतात, ही प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. मार्गालगत संरक्षक भिंती बांधल्या तरी पुन्हा ती पाडून प्रवाशी रूळ ओलांडतात. आमच्याकडून नवीन फूटओव्हर ब्रीजचा कार्यक्रम हाती घेऊ, पण प्रवाशांची मानसिकता बदलण्यासाठी ही मोहीम करतोय', असे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी सांगितले. 
मोहीम कशी राबवणार ? 
ही मोहीम पाच महिने चालणार असून त्यात रेडिओ चॅनेल्स, कॉलेज, कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणेच सेलिब्रिटींचाही सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे जनजागरूकतेचा भाग म्हणून 16 फेब्रुवारीला दुपारी 1.30 वाजता एक मिनिटासाठी मुंबईकरांनी स्तब्ध उभे राहून त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात, दोनशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी या उद्देशाने एकत्र येणार आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून मे किंवा जूनमध्ये ऑनलाईन गेम ऍप सुरू केला जाणार आहे. त्यात, सुरक्षित प्रवासाचे नियम पाळल्यास हा गेम खेळणाऱ्यास गुण मिळणार असून धोकादायक प्रवासाचा शॉर्टकट घेणाऱ्यांचे गुण कमी होतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com