अभिनेता हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर यांनी केले समिक्षकांना लक्ष

टीम ई सकाळ
गुरुवार, 27 जुलै 2017

गुरूवारी आॅनलाईन विश्वात गहजब झाला तो अभिनेता हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या पोस्टने. सिद्धार्थने बुधवारी तर हेमंतने बुधवारी रात्री केलेल्या पोस्टमध्ये मराठी चित्रपटाचे समीक्षण करणाऱ्या समीक्षकांना उद्देशून समिक्षकांची पिल्लावळ या मथळ्याखाली पोस्ट टाकली. तर सिद्धार्थने सिनेमा बघून एका वाक्यात सिनेमाचे वाभाडे काढणाऱ्या समिक्षकांना धारेवर धरले. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही पोस्टमध्ये कुणाही समीक्षकाचे नाव नसल्याने यावर कोणाही समिक्षकाने भाष्या केलेले नाही. 

मुंबई : गुरूवारी आॅनलाईन विश्वात गहजब झाला तो अभिनेता हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या पोस्टने. सिद्धार्थने बुधवारी तर हेमंतने बुधवारी रात्री केलेल्या पोस्टमध्ये मराठी चित्रपटाचे समीक्षण करणाऱ्या समिक्षकांना उद्देशून समिक्षकांची पिल्लावळ या मथळ्याखाली पोस्ट टाकली. तर सिद्धार्थने सिनेमा बघून एका वाक्यात सिनेमाचे वाभाडे काढणाऱ्या समिक्षकांना धारेवर धरले. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही पोस्टमध्ये कुणाही समीक्षकाचे नाव नसल्याने यावर कोणाही समिक्षकाने भाष्या केलेले नाही. 

सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये वन सेंटेन्स रिव्हयूबद्दल नाराजी व्यक्त करतानाच, सिनेमा म्हणजे मजा नव्हे, तो अत्यंत गांभीर्याने बनवला जातो असे सांगून सिनेमा चांगला वाईट कसाही असो, तुम्ही तुमचे मत मांडा पण तुम्ही समिक्षक आहात हे विसरू नका असे लिहिले आहे. तर हेमंत ढोमेने मात्र समिक्षकांची पिल्लावळ या मथळ्याखाली समिक्षक तसेच पत्रकार यांचे आलेले गंभीर अनुभव शेअर केले आहेत. पत्रकार परिषदेत मद्य पिऊन तर्र असल्या पत्रकाराने कसा खरकट्या हाताने शेकहॅंड केला इथपासून समिक्षेमध्ये कलाकारावर होणाऱ्या व्यक्तिगत टीकेचाही निषेध नोंदवला आहे. आपण केलेली पोस्टही गंभीर समीक्षा करणाऱ्यांना नाही असेही यात नमूद केले आहे. पूर्वीचे समीक्षक गांभीर्यांने लिहित. आजचे समीक्षक केवळ मथळे भडक देण्यात धन्यता मानतात असेही ढोमे यांनी लिहिले आहे. अर्थात यात आजच्या कोणाही समीक्षकांचे नाव नसल्याने हे नेमके कोणाबद्दल आहे, ते कळायला मार्ग नाही. 

या दोघांच्या पोस्टची सध्या आॅनलाईन विश्वात चर्चा आहे.