होळीच्या सणाला हीना 

संकलन : भक्ती परब
शनिवार, 11 मार्च 2017

ऍण्ड टीव्हीवर वारिस नावाची मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. आता या मालिकेत होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. कारण या होळीच्या महाएपिसोडमध्ये छोट्या पडद्यावरची आवडती सूनबाई अक्षरा सिंघानिया येणार आहे. हीना खानची आजही अक्षरा म्हणूनच ओळख आहे. तिने लोकप्रियतेच्या शिखरावरची "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' मालिका सोडली आणि खूप प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली. काही वेळ स्वतःसाठी हवाय, नवं काही करायचंय, अशी कारणं देत तिनं ही मालिका सोडली खरी; पण ती सध्या काय करतेय, हा प्रश्‍न सगळ्यांना पडतोच. तर त्याचं उत्तर आहे अक्षरा परत येतेय.

ऍण्ड टीव्हीवर वारिस नावाची मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. आता या मालिकेत होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. कारण या होळीच्या महाएपिसोडमध्ये छोट्या पडद्यावरची आवडती सूनबाई अक्षरा सिंघानिया येणार आहे. हीना खानची आजही अक्षरा म्हणूनच ओळख आहे. तिने लोकप्रियतेच्या शिखरावरची "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' मालिका सोडली आणि खूप प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली. काही वेळ स्वतःसाठी हवाय, नवं काही करायचंय, अशी कारणं देत तिनं ही मालिका सोडली खरी; पण ती सध्या काय करतेय, हा प्रश्‍न सगळ्यांना पडतोच. तर त्याचं उत्तर आहे अक्षरा परत येतेय. "ये रिश्‍ता...'मध्ये नाही तर वारिस या मालिकेत ती फक्त महाएपिसोडमध्ये आपला नृत्याविष्कार दाखवण्यासाठी येणार आहे. तसं हीनाला नृत्य करताना प्रेक्षकांनी याआधीही पाहिलं आहे; पण एक लोकप्रिय मालिका सोडून त्यानंतर छोट्या पडद्यावर फक्त महाएपिसोडसाठी सामील होणं हे जरा प्रेक्षकांना रुचण्यासारखं नाही. पण तरीही हीनाचे फॅन्स तिला या डान्सिंग मूडमध्ये पाहून खुश होतीलच. कारण- हीनाचं पुन्हा येणं हीच मोठी गोष्ट आहे. याविषयी हीना म्हणाली की तिला होळी हा सण खूप आवडतो आणि नृत्य करणंही तिला खूप आवडतं. हीनाच्या नृत्याविष्कारानं सजलेला वारिस मालिकेचा महाएपिसोड कसा रंगतो ते पाहण्याची आता उत्सुकता लागून राहिलीय. हीनानं फूल स्वॅगमध्ये डान्स धमाल केलीय. अशा तिच्या सोशल मीडियावरच्या पिक्‍समध्ये दिसतंय. पण, खरी धमाल प्रेक्षकांना तो महाएपिसोड पाहतानाच येईल. तोवर हीनानं नव्या मालिकेतून येतेय, अशीही सुवार्ता द्यावी, अशी तिच्या फॅन्सची इच्छा आहे. 
संकलन : भक्ती परब