इवलिनला हॉलीवूडची साद 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

इवलिन शर्माने बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. डेव्हिड धवन, रमेश सिप्पी, दिव्या कुमार खोसला, अयान मुखर्जी, इम्तियाज अली यांच्याबरोबर तिने काम केलं आहे. मैं तेरा हिरो, नौटंकी साला, यारियां, ये जवानी है दिवानी आणि जब हॅरी मेट सेजल या चित्रपटांसाठी तिने काम केलंय. ती मध्यंतरी जागतिक शांतता आणि एकता या विषयावर भाषण देण्यासाठी बॉलीवूडची प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत गेली होती.

अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या या नॅशनल प्रेयर ब्रेकफास्टला जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. त्यानंतर तिचं अमेरिकेला सतत जाणं-येणं होतं. त्यामुळे ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात असते की काय? अशा चर्चा रंगल्या होत्या, पण तिनेच यावर आता उत्तर दिलंय की ती काही हॉलीवूडमधील दिग्दर्शकांकडे पटकथा ऐकण्यासाठी- वाचण्यासाठी जात होती.

तिच्या या बोलण्याने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. इवलिन फक्त एवढ्यावरच थांबली नाहीय. तिने न्यूयॉर्क स्थित म्युझिक दिग्दर्शक ब्रुकलिन शांटी याच्याबरोबर गाणंही गायलंय. तिने काही गाणीही लिहिली आहेत आणि त्यावर म्युझिक व्हिडीओही केले आहेत. इवलिन त्यामुळे सध्या खूपच बिझी आहे. इवलिन लवकरच "जॅक ऍण्ड दिल' या चित्रपटातही दिसणार आहे.