मला काही फरक पडत नाही.. कंगनाचा पलटवार!

टीम ई सकाळ
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत सतत चर्चेत आहे. आधी आदित्य पांचोलीच्या प्रकरणामुळे.. नंतर ह्रतिक रोशनसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे तिला सतत प्रश्न विचारले जातायत आणि प्रत्येक प्रश्नाला ती तितक्याच बेधडकपणे उत्तर देउ लागली आहे. तिने दिलेल्या उत्तरांच्या पुन्हा बातम्या झाल्यामुळे कंगना सतत चर्चेत आहे. तिला याच उत्तरांवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी मात्र तिने दिलेलं उत्तर तिच्या धाडसी आणि बेदरकारपणाची साक्ष आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत सतत चर्चेत आहे. आधी आदित्य पांचोलीच्या प्रकरणामुळे.. नंतर ह्रतिक रोशनसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे तिला सतत प्रश्न विचारले जातायत आणि प्रत्येक प्रश्नाला ती तितक्याच बेधडकपणे उत्तर देउ लागली आहे. तिने दिलेल्या उत्तरांच्या पुन्हा बातम्या झाल्यामुळे कंगना सतत चर्चेत आहे. तिला याच उत्तरांवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी मात्र तिने दिलेलं उत्तर तिच्या धाडसी आणि बेदरकारपणाची साक्ष आहे. 

परवा एका इव्हेंटच्या निमित्ताने कंगना मुंबईत एकेठिकाणी आली होती. तिच्याबद्दल सतत सुरू असलेली चर्चा ही तिच्या इमेजसाठी घातक असल्याच्या बातम्याही अनेक मीडियामध्ये आल्या. त्याबद्दल तिला एका पत्रकाराने छेडलं असता, तिने दिलेलं उत्तर चकित करणारं होतं. ती म्हणाली, 'मी खूप लोकांना पाहिलं आहे. आता मी जे काही बोलते त्याच्या बातम्या होतात. पण मी आधीपासून अशीच आहे. मी तेव्हाही असंच बोलत होते. मी जे काही बोलते ते मनापासून बोलते. माझं त्यावेळी जे मत असतं ते मी मांडत असते. आता तुम्ही म्हणता मी असं बोलल्यामुळे माझे खूप शत्रू होतील. मला सिनेमे मिळणार नाहीत. काही लाॅबीज मला काम देणार नाहीत. तर हरकत नाही. काय होतं बघू. मुळात आता गमावण्यासारखं माझ्याकडे काही उरलेलं नाही. मी माझ्या आजवरच्या काळात खूप काही मिळवलं आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार आणि एकामागोमाग एक हिट.. माझ्याकडे खूप आहे. आज आत्ता जरी माझं करिअर थांबलं तरी मला काहीच फरक पडत नाही, असं सांगून तिने एकच गहजब उजवून दिला. 

आता कंगना असं बोलल्यामुळे तिच्यावर आता काय परिणाम होणार याचा अंदाज अद्याप कोणाला नाही. पण ही अशी इतकी धाडसी का आहे, ते लोकांना पटलं.