मी मॅगी विकू शकत असेल, तर... : बच्चन

मी मॅगी विकू शकत असेल, तर... : बच्चन
मी मॅगी विकू शकत असेल, तर... : बच्चन

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा व्यक्त करत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी "जर मी मॅगी विकू शकत असेल, तर मी समाजासाठी आणि शहरासाठी काही चांगले करू शकत नाही का?' असे म्हणत "मी अनेक वर्षांपासून अनेक अधिकाऱ्यांनी हे सांगत आहे', असा दावा बच्चन यांनी केला आहे.

मुंबईतील रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बच्चन उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जर माझ्या आवाजाने मी मॅगी नूडल्स, विकत असेल. सिमेंट विकत असेल. तर मी समाजासाठी आणि शहरासाठी काही चांगले करू शकत नाही का? मला मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्याबाबत मी अनेक वर्षांपासून अनेक अधिकाऱ्यांना याबाबत बोलत आहेत.' रस्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठी चित्रपट तयार करण्याची इच्छाही बच्चन यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, "मी कोणत्याही वेळी जेवढे शक्‍य होतील तेवढे चित्रपट तयार करायला तयार आहे.'

यावेळी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com