आयफा 2018 चा शानदार सोहळा; इरफान खानला बेस्ट अॅक्टर पुरस्कार

IIFA award 2018 at bangkok thailand
IIFA award 2018 at bangkok thailand

थायलंड येथील बँकॉक येथे आयफा 2018 ची धमाकेदार सुरवात झाली. सियाम निर्मित थिएटर येथे आयोजित या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक तारक-तारकांनी हजेरी लावली. कुणाची वेशभूषा चर्चेत आहे तर कुणाचा स्टेज परफॉर्मन्स गाजत आहे. 

खासकरुन बॉलिवूडमधील सध्या नवीन चेहऱ्यांनी आयफाची संध्याकाळ गाजवली. 'सोनू के टिट्टू की स्विटी'फेम नुसरत भरुचा आणि लवकरच 'गोल्ड' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मौनी रॉय यांनी शानदार परफॉर्मन्स दिला. आयुष्मान खुराना आणि कार्तिक आर्यन यांनी या सोहळ्याचे संचालन केले. 
 

 

@varundvn bringing the house down at #IIFA2018

A post shared by IIFA Awards (@iifa) on



‘आईफा रॉक्स’ मध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, सुभाष घई, अनुपम खेर, रेखा, दिया मिर्झा, करण जोहर, अनिल कपुर, श्रद्धा कपूर, कृति सॅनन, गुलशन ग्रोवर, मेहर विज, राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्दीकी, दिव्या खोसला, अनुराग बसु, बॉबी देओल, रितेश देशमुख, कोंकणा सेन शर्मा, राहुल बोस, युलिया विंतुर आणि अन्य स्टार्सनी हजेरी लावली. डिजाइनर शांतनु आणि निखिल यांनी येथे आपले कलेक्शन सादर केले. अनिल कपूर आणि दिया मिर्झा या शोचे शोस्टॉपर होते. डिजाइनर शांतनु आणि निखिल यांनी येथे आपले कलेक्शन सादर केले. अनिल कपूर आणि दिया मिर्झा या शोचे शोस्टॉपर होते. 
 

 

Some Punjab power on stage. #IIFA2018

A post shared by IIFA Awards (@iifa) on


 



'तुम्हारी सुलु' सिनेमाने बेस्ट फिल्मचा किताब पटकावला तर 'हिन्दी मिडीयम'साठी इरफान खानला बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी बेस्ट एक्ट्रेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला. 'हिंदी मीडियम' साठी निर्देशक साकेत चौधरी यांना पुरस्कार पटकाविला तर राजकुमार राव स्टारर फिल्म 'न्यूटन' साठी डायरेक्टर मसुकर यांना बेस्ट स्टोरी पुरस्कार मिळाला. 



याशिवाय काही पुरस्कार...

  • बेस्ट बॅकग्राउंड स्कोर, बेस्ट कोरिओग्राफी आणि बेस्ट स्पेशल इपेक्ट - 'जग्गा जासूस'
  • बेस्ट स्क्रिप्ट पुरस्कार - ‘बरेली की बर्फी’ (नितेश तिवारी आणि श्रेयस जैन)
  • बेस्ट डायलॉग - ‘बरेली की बर्फी’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ 
  • सर्वश्रेष्ठ छायांकन - ‘टाइगर जिंदा है’
  • बेस्ट साउंड डिजाइन - ‘टाइगर जिंदा है’
  • बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - अभिनेत्री मेहर विज (सीक्रेट सुपरस्टार)
  • बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (मॉम)

आयफा 2018 हा सोहळा तीन दिवस पार पडला. रविवारी (ता. 24 जून) मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयफा मुख्य सोहळ्याचे संचालन करण जोहर आणि रितेश देशमुख यांनी केले.  

 





आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com