भारतीय महिला क्रिकेट संघ 'चला हवा येऊ द्या'मध्ये

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या  स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू. ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते.

मुंबई : झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या  स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू. ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते. या टीमशिवाय या कार्यक्रमात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीमसुद्धा सहभागी झाली होती.  येत्या 14 आणि 15 ऑगस्टला रात्री 9.30 वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत. 

यानिमित्ताने पहिल्यांदाच अशा मराठी कार्यक्रमात या खेळाडू सहभागी झाल्या होत्या. "चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो" अस पूनम राऊत म्हणाली तर "विश्वचषक स्पर्धा सुरु असातनाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल उत्सुक होते" असं स्मृती मंधानाने सांगितलं. या सर्व खेळाडूने यात सादर झालेल्या स्किटना भरभरुन आणि खळखळून प्रतिसाद दिला.