इरफान-प्रियंकाचा "गुस्ताखियॉं' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा गेल्या काही वर्षांपासून अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या नातेसंबंधावर चित्रपट बनवण्याचा विचार सुरू होता आणि आता त्याला योग्य कलाकार मिळाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, भन्साळी प्रॉडक्‍शनच्या बॅनरखाली बनत असलेला "गुस्ताखियॉं' चित्रपटासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता इरफान खान यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी इरफानच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले होते.

प्रियंकाच्या नावाचा बऱ्याच कालावधीपासून विचार सुरू होता; पण आता ती या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इरफान आणि प्रियंकाने यापूर्वी चमकू, सात खून माफ आणि गुंडे चित्रपटांत काम केले आहे.