इरफानच्या चित्रपटातील गाण्यांचे लाईव्ह रेकॉर्डिंग 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खानचा नेहमीच विविध भूमिका करण्याकडे कल असतो. बॉलीवूडसोबत त्याने हॉलीवूडमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. आता त्याच्या आगामी "द सॉंग ऑफ स्कॉर्पियन' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चालू आहे. त्याच्या या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण या चित्रपटातील गाण्याचे स्थानिक संगीतकारांबरोबर जैसलमेरच्या मरूस्थलमध्ये लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले. 

इरफान हा अभिनेत्री - संगीतकार गोल्शीफतेह हिच्यासोबत एक चित्रपट करत असल्याची बातमी 2015 मध्ये आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. अनुप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात इरफान एका उंट व्यापाऱ्याच्या भूमिकेत आहे; तर गोल्शीफतेह कोणत्याही रोगावर, जखमेवर संगीताने उपचार करणाऱ्या एका महिलेची भूमिका करत आहे. त्यामुळे या चित्रपटातील संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इरफानला संगीतप्रधान चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली. या चित्रपटात सात गाणी आहेत; पण ही गाणी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच ऐकायला मिळणार आहेत. या चित्रपटात वहिदा रहमान आणि शशांक अरोरा यांच्याही भूमिका आहेत. संपूर्ण चित्रपट हा राजस्थानच्या वाळवंटात चित्रित झाला आहे. 
 
Web Title: Irfan khan songs live recording