मत मांडायलाच हवं का? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

काहीही घडलं की सगळ्यांची नजर असते ते आपले सेलिब्रिटी काय बोलतात याकडे. त्यात आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे, ती म्हणजे कतरिना कैफची. ती इंडस्ट्रीत आल्यापासून सोशल मीडियापासून लांबच होती; पण ती नुकतीच फेसबूक, इन्स्टाग्रामवर आली आहे. त्यामुळे सहाजिकच तिच्या चाहत्यांची जगात घडलेल्या घटनांवर कटरिनाची काही मतं असतील, अशी अपेक्षा होती; 

पण तिने कोणत्याही घडलेल्या घटनांवर आतापर्यंत भाष्य केलेलं नाही. तिला तिचं काही मत असावं असं वाटतही नाही. ती म्हणते, "प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं मत असावं असं मला वाटत नाही. माझ्या बिझी शेड्युलमध्ये मला जगात काय घडतंय, याबद्दल अपडेट राहणं फारच अवघड होऊन जातं. जोपर्यंत मी एखाद्या गोष्टीचा शोध घेत नाही, तोपर्यंत मला अर्ध्या गोष्टी माहितही नसतात. असं असताना मी कोणत्याही गोष्टीबद्दल मत मांडणं योग्य समजत नाही.' कतरिनाला आता चाहत्यांचं मन राखण्यासाठी का होईना; पण जगात काय घडतंय याचे अपडेट्‌स ठेवायला तिला लागणार बुवा... फॅन्स नाराज झाले तर!