नव्या घरी जॅकलिनची 'पोल'खोल!

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई : जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकन ब्युटी म्हणून जरी ओळखली जात असली, तरी आता तिने भारतात चांगले  बस्तान बसवले आहे. अनेक बाॅलिवूडच्या सिनेमांमध्ये तिची वर्णी लागली. आता तिचा जंटलमन हा चित्रपट येतोय. या सिनेमात तिने एक पोल डान्स केलाय, त्याची मोठी चर्चा झाली. चंद्रलेखा या गाण्याला तर तुफान प्रतिसाद मिळाला. या पोल डान्सची तिला इतकी सवय झालीय की आपल्या नव्या घरी तिने खास एक पोल बसवून घेतला आहे. 

नृत्यात चांगले कौशल्य यावे आणि फिटनेस रहावा या दोन्ही गोष्टीसाठी तिने हा पोल बसवून घेतला आहे. विशेष बाब अशी की या पोलवर तालीम करतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आपण घरी कशापद्धतीने तालीम करतो तेच जणू तिने दाखवून दिले आहे. जॅकलिनचे सडौल शरीर आणि असलेला फिटनेस याचीच साक्ष या व्हिडीओमधून पटते.