जॅकलीनला चिंता गाण्याची 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस मागच्या वर्षी टायगर श्रॉफबरोबर "अ फ्लाईंग जट' या चित्रपटात दिसली होती.

सध्या ती "अ जेन्टलमॅन', "जुडवा 2', "ड्राइव्ह' या तीन चित्रपटांत काम करतेय. पण त्याचा तिच्यावर ताण नाहीय. तिला चिंता लागून राहिलीय ती "टन टना टन' या गाण्याची. "जुडवा 2' या चित्रपटात या गाण्याचा रिमेक होणार आहे.

या गाण्यावर तिला या चित्रपटात नाचायचे आहे. सध्या ती नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्यबरोबर या गाण्यावर रोज तीन-चार तास सरावही करत आहे. पण पहिल्या गाण्यासारखी जादू ती या गाण्यात आणू शकेल की नाही, याचं तिच्यावर दडपण आलंय. या चित्रपटात वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.

जॅकलीन याबद्दल बोलताना म्हणाली, "टांग उठाके...' या गाण्यानंतर मी गणेश आचार्यबरोबर दुसऱ्यांदा काम करतेय. मी या गाण्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि तितकंच दडपणही आहे. वरुण अफलातून डान्सर आहे. त्यामुळे त्याच्यासोबत तालाचा ठेका धरणं कठीण जातं. पहिल्या गाण्याची जादू तीच ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.'