Jalebi movies trailer release
Jalebi movies trailer release

'जलेबी'चा ट्रेलर प्रदर्शित; 'ही' टिव्ही अभिनेत्री करणार डेब्यू

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी काही दिवसांपुर्वी 'जिलेबी' या चित्रपटाची घोषणा ट्विटर अकाउंटवरुन केली होती. 'जिलेबी : द एव्हरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून दोन दिवसात 'जिलेबी'च्या ट्रेलरला 90 लाखापेक्षा अधिक व्ह्युज झाले आहे. यावरुनच हा ट्रेलर  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे हे दिसून येतं.

चित्रपटात अभिनेत्री रिया चक्रोबर्ती आणि वरुण मित्रा यांच्या प्रमुख भुमिका आहेत. ही एक लव्हस्टोरी आहे. वरुण या चित्रपटातून त्याचा डेब्यू करणार आहे. 12 ऑक्टोबर ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख सांगत असतानाच चित्रपटाचे पोस्टरही महेश भट्ट यांनी रिलीज केले होते. चित्रपटाचे पोस्टर फार रंजक आहे. रिया ही ट्रेनच्या खिडकीमधून वरुणला किस करतानाचा फोटो पोस्टरवर आहे. 

चित्रपट निर्माते करण जोहरनेही त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन 'जलेबी'साठी शुभेच्छा दिल्या होत्या. गेल्या मार्च महिन्यात महेश भट्ट यांनी 'जलेबी'च्या कलाकारांसोबतचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला होता. 

भावनिक ड्रामा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. चित्रपटात टिव्ही अभिनेत्री दिबांगना सूर्यवंशी ही बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com