हाॅलिवूड: दिग्दर्शक जेम्स टोबॅकवरही लैंगिक अत्याचाराचे आरोप

james tobac new case in hollywood esakal news
james tobac new case in hollywood esakal news

मुंबई : हाॅलिवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वेनस्टेनवर अनेक अभिनत्रींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यात अॅंजेलिना जोलीपासून ब्लेड रनरपर्यंत अनेकींचा सहभाग आहे. सिनेमात काम दिल्यानंतर तो कसा त्रास द्यायचा याचे पाढे अनेकींनी वाचले. ते ताजे असतानाच आॅस्कर नामांकन मिळालेला दिग्दर्शक जेम्स टोबॅक याच्यावरही तब्बल 38 महिलांनी लैंगिक अत्याचारासह असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. 

याची तक्रारही अमेरिकन पोलिसांत दाखल झाली आहे. त्यात दिलेल्या हवाल्यानुसार जेम्सने असभ्य वर्तन केलेलं ठिकाण हे न्यूयाॅर्क स्ट्रीट आहे. तिथे तो वेगवेगळ्या महिलांना भेटत असे. त्यांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवत असे आणि त्यानंतर त्यांना एका हाॅटेलवर बोलावलं जाई. तिथे ती महिला आल्यानंतर जेम्स त्यांच्याशी असभ्य वर्तन करत असे. याबाबात जेम्सकडे अमेरिकन पोलिसांनी विचारणा करायला सुरूवात केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हार्वे वेनस्टेनवरही लैंगिक अत्याचार, असभ्य वर्तन आणि बलात्काराचे आरोप झाले आहेत. जवळपास 60 महिलांनी हार्वेने आपल्यावर आत्याचार केल्याचे सांगत आहेत. अनेक नायिकाही हळूहळू हार्वे विरोधात एकत्र येत आहेत. ही बाब ताजी असतानाच जेम्स टोबॅकविरोधात 38 महिलांनी तक्रार दाखल केल्यामुळे हाॅलिवूडमध्ये कास्टिग काउच हा प्रकार फोफावल्याचे स्पष्ट होतं. 1991 मध्ये बग्सी चित्रपटाच्या पटकथेसाठी जेम्स यांना आॅस्कर नामांकन मिळालं होंतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com