जॅकलिन फर्नांडिसला लागली 'रेस 3' ची लाॅटरी!

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच या मुलाखतीत या चित्रपटानंतर पुढे काय अशी विचारणा होते. त्यावेळी हा चित्रपट झाला की आपण रेस 3 च्या चित्रिकरणाकडे लक्ष देणार आहोत, असे सांगितले आहे.

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच या मुलाखतीत या चित्रपटानंतर पुढे काय अशी विचारणा होते. त्यावेळी हा चित्रपट झाला की आपण रेस 3 च्या चित्रिकरणाकडे लक्ष देणार आहोत, असे सांगितले आहे. 

रेस 3 ची चर्चा जोरावर आहे. बाईक्सच्या शर्यती आणि त्यातून तयार होणारे कथानक असा याचा बाज असतो. रेस आणि रेस 2 ला मिळालेली पसंती पाहता आता रेस 3 चा घाट घालण्यात आला आहे. या चित्रपटात दिपिका पदुकोन, जाॅन अब्राहम यांची निवड झाली होती. त्यांच्यासमोर सलमान खानला उभं करण्यात आले आहे. सलमान आल्यामुळे या चित्रपटाचा भाव कमालीचा वाढला आहे. आता सलमानसमोर कोणत्या अभिनेत्रीला उभे केले जाणार याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. सलमानची गर्लफ्रेंड लुलिया वंतुरच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, जॅकलिनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

रेस 3 हा चित्रपट रेमो डिसुझा दिग्दर्शित करणार आहे. या निमित्ताने रेमो आणि सलमान पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. रेस 3 मिळाल्याने जॅकलिनला मात्र लाॅटरी लागली आहे.