जान्हवी कपूरचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण  

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रपट "स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून ती करियरला सुरुवात करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी जान्हवी खूप मेहनत घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, करण जोहरच्या "धर्मा प्रॉडक्‍शन' बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

जान्हवीच्या ट्रेनिंगवरही विशेष लक्ष दिले जात आहे. मनीष मल्होत्रा, करण जोहर यांच्यासह संपूर्ण टीम जान्हवीला प्रोत्साहन देत आहेत. जान्हवीने कॅलिफोर्नियामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तिला आपली आई श्रीदेवीही अभिनयाबाबत धडे देत आहे. हिंदी भाषा सुधारण्यासाठीही ती ट्रेनिंग घेत आहे.