जॉनचा सिक्‍सर... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता जॉन अब्राहमने एका मराठी चित्रपटाच्या लॉंचिंगवेळी चाहत्यांना वचन दिले होते की लवकरच प्रादेशिक भाषेतील सिनेमाची निर्मिती करेन आणि त्याप्रमाणे यावर्षी तो एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतो आहे. 

"रुस्तम' चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एण्टरटेन्मेंट कंपनीने जॉनसोबत सहा चित्रपटांच्या निर्मितीचा करार केला आहे. यात मराठी सह तीन हिंदी चित्रपट, गुजराती व मल्याळम चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हिंदीतील चित्रपटात जॉन झळकणार आहे. मात्र मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसेल की नाही ही माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवलेली आहे. काही दिवसांपूर्वी "फुगे' चित्रपटाच्या लॉंचवेळी जॉनने सांगितले होते की, "मला मराठी बोलता येते, पण नीट नाही. मी लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे, ज्याच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे असतील. हा सिनेमाच्या शूटिंगला मार्चमध्ये सुरूवात होईल. या चित्रपटात जॉन कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. 

Web Title: john abraham