जस्टिनचा 'प्रोग्रॅम' गुलदस्त्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

त्याचे भारतातील शेड्युल काय असणार आहे? तो मुंबईत कुठे कुठे जाणार आहे? याबद्दल त्याच्या मॅनेजमेंटने कोणालाही थांगपत्ता लागू दिलेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा पठ्ठ्या मुंबईत काही ठिकाणे फिरणार आहे.

ज्याच्या आगमनाची राजेशाही तयारी चालू आहे तो जस्टिन बिबर अखेर आज मुंबईत येणार; पण कधी हे कोणालाच माहीत नाही. इतकेच नव्हे तर त्यांचा भारतातील कार्यक्रमही गुलदस्त्यात आहे.

23 वर्षांचा हा जगप्रसिद्ध पॉपस्टार येणार आहे स्वत:च्या जेट विमानातून. तो आल्यानंतर विमानतळावर त्याला पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना भेटणार नाही, तर तो थेट हॉटेलवर जाणार आहे. त्याच्या दिमतीसाठी मुंबईतील तीन पंचतारांकित हॉटेल्स बुक केली आहेत. तो कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहे हे कोणालाच माहीत नाही. त्याचे भारतातील शेड्युल काय असणार आहे? तो मुंबईत कुठे कुठे जाणार आहे? याबद्दल त्याच्या मॅनेजमेंटने कोणालाही थांगपत्ता लागू दिलेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा पठ्ठ्या मुंबईत काही ठिकाणे फिरणार आहे.

त्यातील एक ठिकाण म्हणजे गेट वे ऑफ इंडिया. त्यानंतर तो अनाथ आश्रमालाही भेट देणार आहे. एवढा मोठा पॉपस्टार आणि बॉलिवूड यांपासून दूर कसे राहील. त्यामुळे मुंबईतील काही उच्चवर्गातील लोकांसाठी त्याने पार्टी ठेवल्याचेही समजते आहे.