राजापेक्षाही वरचढ थाट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

जस्टिन बिबर हा कॅनेडियन पॉपस्टार त्याच्या वर्ल्ड टूर पर्पजसाठी पहिल्यांदा भारतात परफॉर्म करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर 10 मे ला त्याचा परफॉर्मन्स आहे. हजारो रुपये खर्च करून अनेक चाहते त्याचा हा परफॉर्मन्स बघायला जातीलही; पण या पठ्ठ्याच्या मागण्या ऐकाल, तर तुम्हीही थक्क व्हाल. नुकतीच म्युझिक जर्नालिस्ट अर्जुन एस. रवी यांनी जस्टिन बिबरच्या सूत्रांनी दिलेली प्रेस रिलिज ट्‌विटरवर शेअर केली आणि त्याच्या या भारतातल्या टूरचा शाही थाट दिसून आला.

जस्टिन बिबर हा कॅनेडियन पॉपस्टार त्याच्या वर्ल्ड टूर पर्पजसाठी पहिल्यांदा भारतात परफॉर्म करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर 10 मे ला त्याचा परफॉर्मन्स आहे. हजारो रुपये खर्च करून अनेक चाहते त्याचा हा परफॉर्मन्स बघायला जातीलही; पण या पठ्ठ्याच्या मागण्या ऐकाल, तर तुम्हीही थक्क व्हाल. नुकतीच म्युझिक जर्नालिस्ट अर्जुन एस. रवी यांनी जस्टिन बिबरच्या सूत्रांनी दिलेली प्रेस रिलिज ट्‌विटरवर शेअर केली आणि त्याच्या या भारतातल्या टूरचा शाही थाट दिसून आला.

या यादीप्रमाणे जस्टिन बिबरने दोन पंचतारांकित हॉटेल्स बूक केली आहेत. त्यातील तीन मजले फक्त त्याच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. त्याच्या 1000 स्क्‍वेअर फूटच्या रूमचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्यात आलाय. त्याच्यासाठी चार दिवस हे तीनही मजले बूक केलेले आहेत. एक लिफ्ट खास त्याच्यासाठी सुरू राहणार आहे; तसेच त्याने स्वागतासाठी एक रोल्स रॉयस, 10 लक्‍झरी गाड्या, दोन व्होल्वो बसेस, त्याच्यासाठी झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि त्याचे स्वत:चे आठ अंगरक्षक असावेत, अशी मागणी केलीय. पिंग पॉंग टेबल, प्ले स्टेशन, आयओ हॉक, सोफा सेट, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, वॉर्डरोब, मसाज टेबल, बॅकस्टोज आणि हव्या असणाऱ्या इतर काही गोष्टींसाठी 10 कंटेनर त्याने मागितले आहेत. त्याच्यासाठी परफॉर्म करण्याआधी रिलॅक्‍ससेशनसाठी जॅकुझीची सोय, त्याला योगाची भयंकर आवड असल्याने त्याच्या खोलीत खास योगाची पुस्तके, सुवासिक तेलं, केरळवरून खास योग प्रशिक्षक; तसेच त्याच्यासाठी दररोज चार दिवस वेगवेगळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तेही त्याच्या सुपरहिट गाण्याच्या नावावर असलेले असा त्याचा राहण्याचा थाट असणार आहे.

त्याचप्रमाणे त्याच्यासाठी त्याला जर भारतात कुठे फिरायचे असेल, तर प्रायव्हेट जेट किंवा चॉपर याची सोय करावी. एवढ्या त्याच्या मागण्या आहेत. हेही नसे थोडके म्हणूनच की काय त्याने ऑरगॅनिक कापलेली फळं, बिया नसलेली द्राक्ष, ऑरगॅनिक टर्कि, लेट्युस, चीजचे वेगवेगळे प्रकार, काळे ऑलिव्ह; तसेच काळे व बनाना पेपर. याशिवाय, बॅकस्टेज असताना त्याच्यासाठी व्हाईट ब्रेड, बटाट्याचे वेफर्स, चेडार चीज पॉपकॉर्न, खारवलेले बदाम काजू, मिंट, मेन्थॉल, वॉटरमेलन गम, ड्रायफ्रुट, खारे दाणे, स्विडिश फिट, पीनट बटर आणि चीज सॅंडविचेसही सोय करण्यास सांगितले आहे. त्याची चेंजिंग रूम संपूर्ण पांढऱ्या पडद्यांनी झाकलेली असावी आणि कपड्यांसाठी वेगळे कपाट असावे. सोबत 12 पांढरे हातरूमाल असावेत. त्याला तहान लागली तर ग्लास डोअर रेफ्रिजरेटर, 24 बाटल्या साधे पाणी, 4 एनर्जी ड्रिंक, 6 व्हिटामिन पाण्याच्या बाटल्या, 6 क्रिम सोडा आणि कोल्ड ड्रिंकने भरलेला कूलर; तसेच 4 नॅचरल ज्यूस, 4 व्हॅनिला प्रोटिन ड्रिंक, बदामाचे दूध एवढेच नाही तर त्याचे आवडते टी शर्ट आणि आवडती पेये. एवढी सगळी यादी वाचून तुम्ही पण दमलात ना. राजाचाही एवढा पाहुणचार होत नाही एवढी यादी जस्टीन बिबरने पाठवली आहे. त्याच्या या शाही थाटाच्या मागण्या ऐकून थक्क व्हायला होते. गेले काही दिवस त्याच्या या मागण्या सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या आहेत.