सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवणारा 'कच्चा लिंबू'

शुक्रवार, 13 एप्रिल 2018

65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. ज्यात 'कच्चा लिंबू'ने बाजी मारली.

आज 'कच्चा लिंबू' या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. ज्यात 'कच्चा लिंबू'ने बाजी मारली. प्रसाद ओक यांचा पहिलावहीला दिग्दर्शित चित्रपटाने थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. सोलो दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. गेल्या वर्षी 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

जयवंत दळवी लिखित 'ऋणानुबंध' या कथेवर हा चित्रपट बनला आहे. स्पेशल मुलाचे आई-वडील हा कथेचा मुळ गाभा आहे. मन्मीत पेम, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांच्या अभिनयाने नटलेला असा हा चित्रपट आहे. ‘बीपी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ सारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा अभिनेता म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट असूनही रवी जाधव यांनी मुरलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय केला आहे. ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट शूट करण्यात आला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kaccha Limbu Got 65th National Film Award