जगात भारी 'कच्चा बादाम'ची वारी; शेंगाविक्रेत्याच्या गाण्याचा धुमाकूळ

'बादाम बादाम दादा कच्चा बादाम' हे गाणं कोणी मोठ्या प्रसिद्ध गायकाने गायले नसून खेड्यात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भुबन बद्द्याकर यांनी गायले आहे.
kachha Badam
kachha BadamSakal

ब्रह्मपुरी : सोशल मीडिया प्लेटफार्म हे जगभरात प्रसिद्धीसाठी असले तरी कोण आपली कलागुण कुठल्या कलेने अवगत करून प्रसिद्धीसाठी चमकेल हे सांगता येत नसले तरी असाच हा प्रवास सोशल मीडियातील शेंगाविक्रेतेच्या गाण्याने धुमाकूळ घातला असून जगभरातूनही या गाण्याची क्रेझ पहावयास मिळत आहे.

'बादाम बादाम दादा कच्चा बादाम' हे गाणं कोणी मोठ्या प्रसिद्ध गायकाने गायले नसून खेड्यात फिरून आपला उदरनिर्वाह करीत असलेला तसेच रस्त्यावरती शेंगदाणा विक्री करणारा भुबन बद्द्याकर हे होय. पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील एका खेड्यातील भुबन हा शेंगदाणा विक्रेता गेल्या दहा-बारा वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. बंगाली भाषामध्ये शेंगदाण्याला कच्चा बादाम असे संबोधले जात असून हे गाणे गात आपला शेंगदाणा विक्रीचा व्यवसाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाणे गात असून ह्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला त्यानंतर एका कंपनीने भुबन ला घेऊन तो व्हडिओ करून सोशल मिडीयात शेअर केला.

kachha Badam
इयत्ता आठवी ते बारावीच्या मुलींसाठी सायकल वाटपाच्या अनुदानात वाढ

हे गाणे फेसबुक, व्हॉट्सअप ,इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब आदी सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेक रिल्सवर व्हिडिओ पाहिले असतील. शेंगदाणा विक्रेते करणारा भुबन बद्द्याकर हा 'बादाम बादाम दादा कच्चा बादाम' हे गाणे भारतात नव्हे तर परदेशातही बोलबाला असून अगदी सेलिब्रिटी सुद्धा थिरकले पासून राहिले नाही. सोनू मंडल च्या 'तेरी मेरी कहानी ' तसेच सहदेव च्या' जान मेरी जाने मन ' या गाण्यानंतर ' बदाम दादा कच्चा बदाम ' ह्या गाण्याचे लाखो रिल्स बनवत जगभरात खूप पसंदी मिळवली आहे.

देश - विदेशा मध्ये रसिकांनी ह्या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन करमणूक करत लहान बालकापासून ते वयोवृद्ध रसिकांनी गाण्याचे रिमिक्स बनवून धुमाकूळ घातला आहे तसेच दक्षिण कोरिया तील एका आई मुली च्या जोडी ने 'कच्चा बादाम' गाण्याचा डान्स करत व्हिडिओ व्हायरल केला असून ह्या गाण्याचा व्हिडिओची कॉपी प्रत्येक जण वेगळ्या पध्दतीने दररोज रिल्स बनवून करमणूक करीत असल्याने फुटपाथ ते बॉलीवूड, हॉलिवुड चे कलाकारही देश - विदेशात प.बंगाल मधील भूबन च्या 'कच्चा बादाम' लोकप्रिय असलेल्या गाण्याचे व्हिडिओ लाखों नेटीजन्स भुरळ पाडत मंत्रमुग्ध असून सोशल मिडीयात हे गाणे अफाट व्हायरल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com