मुक्ताने केले कालिदास नाट्यगृहाचे कौतुक

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या अनास्थेबद्दल आवाज उठवला. नादुरूस्त असलेली ध्वनी यंत्रणा, फाटलेले पडदे, गळणारे स्लॅब यापासून अस्वच्छ स्वच्छतागृहे यावर बऱ्याचदा सोशल मीडीयामार्फत टीका होते. त्याच्या बातम्या होता. मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, सुमित राघवन आदींनी याबाबत आवाज उठवला. आज मात्र अभिनेत्री मुक्ता बर्वेने कालिदास नाट्यगृहाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. 

या नाट्यगृहाची यंत्रणा फारच सुंदर आहे. अत्यंत स्वच्छ आणि नेंटकं नाट्यगृह असल्याची पावतीच जणू तिने दिली आहे. त्याचवेळी आदेश बांदेकर यांचंही तिने अभिनंदन केलं आहे. कालिदास नाट्यगृहाचे ते विश्वस्त असल्याचंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.