कमल हसन यांना 'बिग बाॅस' भोवणार?

टीम ई सकाळ
सोमवार, 31 जुलै 2017

अभिनेते कमल हसन सध्या वेगळ्याच प्रकरणात अडकण्याची चिन्हे आहेत. तामीळमध्ये सुरू असलेल्या बिग बाॅस सीझनचे ते होस्ट आहेत. या शोवेळी स्पर्धकांशी बोलताना त्यांनी तामीळी राजकीय पक्ष असलेल्या पुडीया तमिलंगम या पक्षाबद्दल काही वक्तव्ये केली.

मुंबई : अभिनेते कमल हसन सध्या वेगळ्याच प्रकरणात अडकण्याची चिन्हे आहेत. तामीळमध्ये सुरू असलेल्या बिग बाॅस सीझनचे ते होस्ट आहेत. या शोवेळी स्पर्धकांशी बोलताना त्यांनी तामीळी राजकीय पक्ष असलेल्या पुडीया तमिलंगम या पक्षाबद्दल काही वक्तव्ये केली. त्यानंतर हा पक्ष खडबडून जागा झाला आहे, आपल्या पक्षाची प्रतिमा हसन यांनी मलीन केली असून, अब्रूनुकसानी म्हणून त्यांनी चक्क शंभर कोटींचा दावा ठोकला आहे. 

हा शो प्रसारित होणारे खासगी चॅनल आणि हसन या दोघांबर याप्रकरणी केस ठोकण्याचा विचार हा पक्ष करत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शोमध्ये कमल हसन यांनी आपल्या स्पर्धकांशी बोलताना त्यांची तुलना पुडीया तामिलंगम या पक्षाशी करून काही वक्तव्ये केली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी हसन आणि टीव्ही चॅनल या दोघांनी पुुढील सात दिवसांत आपल्या पक्षाची लेखी माफी मागावी, अन्यथा परिणामांना समोरेे जावे असा इशारा यात देण्यात आला अाहे. 

अद्याप हसन वा चॅनल दोघांनीही माफी मागितलेली नाही. दोघांपैकी कुणीही आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.