कपिलचा शो हसवतच राहणार; चॅनलसोबत एक वर्षाचा नवा करार

टीम ई सकाळ
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

अलीकडच्या सर्व अफवांवर पूर्णविराम ठेवत, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि कपिल शर्मा यांनी त्यांची भागीदारी रिन्यू केली आहे. त्यांच्यातील करार आणखी एक वर्षासाठी वाढला आहे. हा कार्यक्रम विनोदी मनोरंजन क्षेत्रात नाविन्याचा शोध घेऊन विनोदी कार्यक्रमाचा मापदंड म्हणून स्वतःचे स्थान टिकवून आहे.

मुंबई : अलीकडच्या सर्व अफवांवर पूर्णविराम ठेवत, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि कपिल शर्मा यांनी त्यांची भागीदारी रिन्यू केली आहे. त्यांच्यातील करार आणखी एक वर्षासाठी वाढला आहे. हा कार्यक्रम विनोदी मनोरंजन क्षेत्रात नाविन्याचा शोध घेऊन विनोदी कार्यक्रमाचा मापदंड म्हणून स्वतःचे स्थान टिकवून आहे.
 
या घडामोडींबद्दल बोलताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे EVP आणि प्रमुख दानिश खान म्हणाले, “द कपिल शर्मा शो प्रत्येक वीकएंडला जगभरातील लाखो प्रेक्षकांना हसवतो. कपिलची प्रतिभा अद्वितीय आहे आणि आमच्यातील करार आणखी एक वर्षासाठी वाढवून, त्याच्याशी सोनीचे असलेले नाते अधिक दृढ करताना आम्ही आनंद अनुभवत आहोत. आम्हाला खात्री आहे की हा शो आणि त्यातील गुणी कलाकार असेच जगभरातील लोकांना हसवत राहतील.”
 
याबाबत कपिल शर्माने पुस्ती जोडली, “इतकी वर्षे प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम आणि आपुलकी दिली आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. हा त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे ज्यामुळे आम्हाला प्रत्येक
आठवड्याला काही तरी नवीन करण्यासाठी आणि घराघरातील लोकांना हसविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. माझ्यावर आणि आमच्या कार्यक्रमावर सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि आम्हाला प्रत्येक आठवड्यात घराघरात मनोरंजन पोहोचविण्यास त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल मी या वाहिनीचा ऋणी आहे.”