कपिल - सुनील मनोमिलन होणार?

गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कपिलच्या या भाषेमुळे दोघांमधला बर्फ वितळून आता हे मनोमिलन होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कपिल-सुनील एकत्र आले तर पुन्हा एक चांगला नवा शो रसिकांना पाहायला मिळेल अशी आशा या शोचे पडद्यामागचे कलाकार करताहेत. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातलं शीतयुद्ध संपायचं नाव घेत नाहीय. विमानात झालेल्या प्रकारानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला. त्यानंतर त्या शोला घरघर लागली. पुढे कपिललाच ग्रहण लागल्यासारखी स्थिती झाली. इकडे सुनीलने आपला असा शो सुरू केला. त्याला लोक येऊ लागले. यातून प्रमोशन केलं की लोक येतात हे कपिलला कळलं. आता मात्र सुनील शिवाय तरणोपाय नसल्याची खात्रीच जणू त्याला पटली आहे. म्हणूनच कपिलने आता पॅच अपची भाषा सुरू केली आहे. 

याबद्दल बोलताना तो म्हणाला, सुनील आणि मी.. आमच्यात जे काही झालं तो आता भूतकाळ आहे. सध्या सुनील कॅनडात आहे. तो आला की मी त्याच्याशी बोलणार आहे. आम्ही परत एकत्र येऊ शकतो का याची शक्यता मला तपासायची आहे. आम्ही एकत्र येऊन आणखी नवा काही शो करता येतो का तेही पाहू. इतकंच नव्हे, तर कपिल शर्मा शोमधले सगळे कलाकार आॅन बोर्ड असणार आहेत. फक्त आता शोची संकल्पना नेमकी काय असेल ते सुनील आल्यानंतरच आम्ही ठरवू. 

टॅग्स