करिना : सोळा - एकोणीस 

संकलन: भक्ती परब
मंगळवार, 6 जून 2017

तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना. हे करिना सोळा - एकोणीस काय आहे? तर असं आहे की, नुकतीच करिना जिमबाहेर येताना दिसली.

तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना. हे करिना सोळा - एकोणीस काय आहे? तर असं आहे की, नुकतीच करिना जिमबाहेर येताना दिसली.

तेव्हा तिच्या मूळ तजेलदार चेहऱ्याने आणि सडपातळ अंगकाठीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आणि तिने 16 किलो वजन कमी केलंय, अशी चर्चा सुरू झाली. आपल्या फिटनेसविषयी नेहमी जागरूक असणाऱ्या करिनाने बाळंतपणानंतर 19 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं आणि गेल्या तीन महिन्यांत तिने 16 किलो वजन कमी केलंय. आता करिना लवकरच तिचं 19 किलोचं लक्ष्य गाठेल. करिनाने या वेळेस व्यायामासोबत योगविद्येचाही समावेश केला होता. तिच्या मूळ रूपात येण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतलीय. अमृता अरोरा आणि करिनाचा वर्कआऊट व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल ना ! "उडता पंजाब' सिनेमाच्या चित्रीकरणानंतर करीनाचं गर्भारपणात 18 किलोनं वजन वाढलं होतं. त्यामुळे "वीरे दी वेडिंग' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी 19 किलो वजन कमी करणार हे लक्ष्य ठेवलं होतं. आणि करिनाने एखादा निश्‍चय केला की, ती त्यावर ठाम राहते, हे तिच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राखून योग्य पद्धतीने डाएट कसं करायचं हे करिनामुळे अनेकांना कळलं. करिनाकडून ही गोष्ट तर नक्कीच शिकण्यासारखी आहे. काय मग, कळलं ना ! हे करिना सोळा - एकोणीस काय ते!