टाॅपलेस शाॅट देण्यासाठी करिश्माच्या होत्या अटी!

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

यह रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता अशा मालिकांमधून चमकलेली करिश्मा अचानक रागिणी.. मधून बोल्ड अवतारात आली. तिचे ट्रेलर, प्रोमो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुढे ही सीरिज हीट झाली ती त्यातल्या बोल्ड दृश्यांमुळे. तिचा हा अवतार पाहून अनेकांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यापर्यंत कोणी पोचू शकत नव्हतं. अखेर एका इंग्रजी मासिकाला तिने मुलाखत दिली. त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांना तिने मोकळेपणाने उत्तरं दिली. यातलाच एक प्रश्न होता की तिने टाॅपलेस शाॅट दिला कसा. 

मुंबई : आॅनलाईन जगतातचा मोठा फायदा असा की नाटक, चित्रपटाप्रमाणे या माध्यमावर अजून तरी सेन्साॅरशिप लादण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता अनेक मंडळी या माध्यमात प्रयोग करत असतात. हा भाग लक्षात घेऊन 'अल्ट बालाजी'ने 'रागिणी एमएमएस रिटर्न्स' ही वेबसीरीज आणली. सेन्साॅरचं भय नसल्यामुळे सुरूवातीपासूनच ती गाजू लागली. या वेबसीरीजचं पोस्टर कमालीचं गाजलं. यातल्या टाॅपलेस नायिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव आहे करिश्मा शर्मा. तिने या सीरीजमध्ये टाॅपलेस शाॅट दिले खरे. पण यासाठी तिने काही अटी घातल्या होत्या. 

'यह रिश्ता क्या कहलाता है', 'पवित्र रिश्ता' अशा मालिकांमधून चमकलेली करिश्मा अचानक 'रागिणी.. 'मधून बोल्ड अवतारात आली. तिचे ट्रेलर, प्रोमो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुढे ही सीरिज हीट झाली ती त्यातल्या बोल्ड दृश्यांमुळे. तिचा हा अवतार पाहून अनेकांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यापर्यंत कोणी पोचू शकत नव्हतं. अखेर एका इंग्रजी मासिकाला तिने मुलाखत दिली. त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांना तिने मोकळेपणाने उत्तरं दिली. यातलाच एक प्रश्न होता की तिने टाॅपलेस शाॅट दिला कसा. 

याबद्दल बोलताना ती म्हणाली, की 'या सीरीजची कल्पना मला आधीच देण्यात आली होती. ती बोल्ड असणार आहे. त्यात टाॅपलेस शाॅट असणार आहेत, किसिंग सीन असणार आहेत हे मला आधीच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अचानक असं इथे काही घडलेलं नाही. माझी अट इतकीच होती, की टाॅपलेस शाॅट देण्यासाठी त्या स्क्रिप्टची तशी गरज असायला हवी. ती होती. त्यामुळे मी टाॅपलेस सीन दिले. '

यात करिश्माने दिलेल्या चुंबन दृश्यांबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, सिद्धार्थ हा माझा चांगला मित्र आहे. आम्ही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला दडपण आलं नाही. असे सीन देताना दिग्दर्शक वगळता सर्व पुरूषांनी खोलीत असू नये, असा फतवा तिने काढल्याचा पुनरुच्चार केल्यानंतर ती म्हणाली, मी असं कधीच म्हटलं नाही. मी माझं काम करत असते, तसंच दिग्दर्शक, कॅमेरामन, मेकअपमन त्यांचं काम करत असतात. त्यात मी ढवळाढवळ कशी करू?

रागिणी एमएमएस रिटर्न्स हे तुझ्या आईने पाहिलं का? यावरही तिने उत्तर दिलं. ती म्हणाली, यातले काही भाग तिने पाहिले. पण ते पाहिल्यावर ती अपसेट झाली. एकता कपूर आणि या सेटवरचे सर्व लोक समजून घेऊन टीम असल्यासारखे काम करत असल्यामुळे असे सीन देणं सोपं गेलं असंही तिने सांगितलं.