योद्धा राजकुमारी कतरिना 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

कतरिना कैफ "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात छोटीशी भूमिका करणार असल्याचं आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं आहे.

या चित्रपटात ती एका विदेशी स्त्रीचा रोल करणार असल्याचं बोललं जात होतं; पण तसं काही नाहीय. कतरिना योद्धा राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ब्रिटिशकालीन भारतात घडते.

त्यामुळे कतरिनाची भूमिका त्याकाळी भारतात होऊन गेलेल्या लोकप्रिय योद्धा राजकुमारीवर आधारित आहे. तिच्या लूक आणि मेकअपवर विशेष काम केलं जात आहे. तिच्या वेशभूषेलाही वेगळा टच देण्यात आलेला आहे. कतरिना पहिल्यांदाच अशा राजकुमारी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक लवकरच सगळ्यांसमोर येईल. 