कतरिनाने घेतला बकेट चॅलेंज 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

जेव्हा सुट्टीच्या दिवशी रविवारीदेखील काम करायला लागते तेव्हा काय करायचे हे कतरिनाने सगळ्यांना दाखवले. झोप अनावर होत असतानादेखील जागे राहण्यासाठी कतरिनाने बकेट चॅलेंज घेतला.

मध्यंतरी बकेट चॅलेंज खूप प्रसिद्ध झाला होता. बर्फाएवढे थंड पाणी स्वत:च्या अंगावर ओतून घ्यायचे असा तो चॅलेंज होता. पण कतरिनाने काहीसा वेगळा चॅलेंज घेतला आहे. तिने बर्फाच्या पाण्यात आपला चेहरा काही सेकंदासाठी बुडवून ठेवला.

तिचा हा व्हिडीओ तिने तिच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. त्याखाली तिने लिहिले आहे की, "रविवारी काम करावे लागत असल्यास डोळे उघडे ठेवण्यासाठी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.' सध्या कतरिना "टायगर जिंदा है'च्या चित्रीकरणात व्यस्त आहेच; पण तिला "जग्गा जासूस'च्या प्रमोशनसाठीही फिरावे लागते आहे. त्यासाठी हा सगळा खटाटोप!